प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर आणि तेजस्वी दिसावा असं वाटत असतं.यासाठी प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो. मात्र वाढतं वय, हार्मोन्समधील बदल आणि चेहऱ्यावरील पिंपल्स यामुळे चेहऱ्यावर काळ्या डागांची समस्या सुरु होते. अशावेळी बरेचजण ते घालवण्यासाठी बाजारातील काही क्रीम्स किंवा पार्लरमध्ये ट्रीटमेंट घेतात. पण हे डाग जर जास्त नसतील तर घरगुती उपायांनी सुद्धा दूर होऊ शकतात. तुम्ही सुद्धा चेहऱ्यावर येणाऱ्या काळ्या डागांनी त्रस्त आहात का? मग यासाठी खाली दिलेले काही सोपे घरगुती उपाय नक्कीच उपयोगी ठरतील.
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी करावा. कोरफडीतील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचेचे डाग वेगाने कमी होतात . यासाठी काळ्या डागांवर कोरफडीचे जेल किंवा कोरफडीचा गर आपण लावू शकतो.
एक चमचा बेसनपीठात २ चमचे दूध थोडेसे मीठ घालून हे मिश्रण डागांवर लावून १० मिनिटे ठेवावे याचा नक्कीच परिणाम येईल.
लिंबाचा रस चेहऱ्यावर लावा आणि काही सेकंद तसेच सोडा. मग पाण्याने चेहरा धुवून घ्या. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे काळे डाग कमी करण्यास मदत होते.
चंदन आणि गुलाबपाणी अथवा दुधात चंदन मिक्स करून याचा लेप चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावल्यास ते डाग लवकर निघून जाण्यास मदत होते आणि त्वचाही उजळते.
बटाटा कापून तो थोड्या वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि मग चेहऱ्यावर जिथे काळे डाग असतील तिथे हा बटाटा चोळा.बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे घटक उत्तम प्रमाणात उपलब्ध असतात जे चेहऱ्यावरील काळ्या डागांवर परिणामकारक ठरतात.
कस्टर्ड ऑईल त्वचा आणि केसांसाठी खूप उपयुक्त आहे. कस्टर्ड ऑईलचे थेंब चेहऱ्यावरील डाग असणाऱ्या ठिकाणी लावल्याने फायदेशीर ठरते.
टीप : (कोणताही उपचार घेण्याआधी सौंदर्यतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Previous Articleराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
Related Posts
Add A Comment