गेल्या महिन्यात पुण्यात आयोजित केलेल्या मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे नगरसेवक, माजी शहर अध्यक्ष, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थकवसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरु होती.मला या कार्यक्रमात बोलू द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया देखील मोरे यांनी तेव्हा दिली होती. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यामुळे मोरे आता मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादीची वाट धरणार की काय अशी चर्चा सुरु होती. मात्र, मोरेंनी आपण मनसे सोडणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
दरम्यान, मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान त्यांनी शुक्रवारी दुपारी वसंत मोरेंना भेटीसाठी बोलवलं आहे. ृत्यामुळे या भेटीनंतर मोरेंची नाराजी दूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी स्वतः राज ठाकरे यांनी मोरे यांच्याशी चर्चा केली होती, मात्र त्यानंतरही पुण्यात मनसेमधील धुसफूस कायम असल्याचं चित्र बघायला मिळालं आहे.
Related Posts
Add A Comment