ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नवी आघाडी स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 2014 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार त्यांनी केला असून, देशभरातील विरोधीपक्षांची ते मार्चमध्ये सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
केजरीवाल आणि मान हे दोघेही एक दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता मातोश्रीवर जाऊन ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. तसेच 2024 मध्ये मोदींना कसं रोखायचं याबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.