कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील गणेश तलावाभोवती वृक्षारोपणसाठी खड्डडे मारण्याच्या कामाचा प्रारंभ तहसीलदार मुळे – भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तलावाच्या चालू असलेल्या विविध कामांची तसेच प्रस्तावित कामाची पाहणी करून माहिती घेतली.

माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी कामाचा आढावा व मिळणारा लोकसहभागाची माहिती दिली. यानंतर तलावाशेजारच्या पाणंद रस्त्याच्या कामाचा प्रारंभही तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आले. तलाव गाळमुक्त करण्याचे तसेच क्रीडांगण निर्मिती, वृक्षारोपण, सुशोभिकरण ग्रामस्थांनी लोकसहभागातून हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे असे करवीर तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी सांगितले.
यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक उत्तमराव वरुटे, उद्योगपती सर्जेराव सुर्यवंशी, उद्योगपती प्रताप पाटील, सरपंच दिनकर गावडे, तलाठी नामदेव पाटील, ग्रामसेवक बी.एस.कांबळे, माजी सरपंच सर्जेराव तिबिले, भगवान सुर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, क्रीडांगण निर्मिती कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी स्वागत कॉ. दिनकर सुर्यवंशी यांनी केले तर आभार कृष्णात गावडे यांनी मानले.