Maha Vikas Aghadi Morcha : चालण हे प्रतिकात्मक आहे. ज्यांनी आम्हाला आजपर्यंत डिवचल त्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावरून चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्रानंतर हा सर्वात मोठा लढा आहे. बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला. महामोर्चात संबोधताना त्यांनी शिंदे गटावरही हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यपाल हटाव यासाठी हा मोर्चा आहे.आम्ही कोश्यारींना राज्यपाल मानत नाही. राज्यपाल हे मोठ पद असतं. पण या पदावर कोणीही बसाव आणि टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात, मात्र त्याचा कोश्यारींना विसर पडला आहे अशी टिका उध्दव ठाकरे यांनी केली.
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विरोधक काहीही वक्तव्य करत आहेत. हे वैचारिक दारिद्य आहे. छत्रपतींच नाव घेण्याचा लफंग्यांना अधिकार नाही. भीक शब्दावरून ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला. यावेळी महाराजांची तुलना शिंदेंशी करणाऱ्या मंगलप्रभात लोढांवर निशाणा साधला.
Related Posts
Add A Comment