महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे () ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली असून त्यांनी महाविकास आघाडीचे () उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकीमध्ये हाती आलेल्या निकालानुसार नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले हे आघाडीवर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या बाल्लेकिल्ल्यात कॉंग्रेसने शेवटच्या घटकेत धक्का दिला आहे. भाजपचे आमदार नागो गाणार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाळे 7 हजार मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकांच्या अंतिम निकालांची अजून प्रतीक्षा आहे.
Related Posts
Add A Comment