ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात आज अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. राणे यांची प्रकृती स्थिर असून, पुढील तीन-चार दिवस त्यांना रुग्णालयातच विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते.
नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या शरीरातील धमण्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करून एक स्टेन टाकण्यात आली. डॉक्टर कलारिकल मॅथ्यू यांनी राणेंवर अँजिओप्लास्टी केली. राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी होण्याची ही दुसरी वेळ आहे. विश्रांतीसाठी राणे यांना तीन चे चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.