सकाळच्या धावपळीत झटपट नाश्ता जर करायचा असेल तर ब्रेडचा चिवडा उत्तम पर्याय आहे.हा चिवडा झटपट देखील होतो आणि चविष्ट देखील लागतो. जाणून घेऊयात हा चिवडा कसा बनवायचा.
साहित्य
ब्रेड स्लाइस – 5 ते 6
चिरलेले कांदे – 2
शेंगदाणे – पाव वाटी
कडिपत्ता
कोथिंबीर
जिरे मोहरी – अर्धा चमचा
हळद – अर्धा चमचा
लाल तिखट – अर्धा चमचा
साखर – एक चमचा
मीठ – चवीनुसार
तेल
कृती
सर्वप्रथम सर्व ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घ्या.यानंतर कढईमधे ३ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्या आणि बाजूला काढून घ्या. आता गरम तेलातच जिरे मोहरी टाकून तडतडू द्या.यानंतर त्यामध्ये कांदा आणि कडीपत्ता घालून परतून घ्या.कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मीठ,हळद,साखर आणि लाल तिखट घाला. आता त्यामध्ये ब्रेडचे तुकडे घालून परतून घ्या. यांनतर त्यामध्ये कोथिंबीर घालून गरमागरम टेस्टी चिवडा सकाळच्या नाश्त्याला सर्व्ह करा.
Previous Articleभारत आणि 24 आफ्रिकन देशात उद्यापासून संयुक्त लष्करी सराव
Related Posts
Add A Comment