Rahul Gandhi : मी गांधी आहे माफी मागणार नाही. खासदारकी रद्द केली तरी मला फरक पडत नाही. या देशाने मला प्रेम, प्रतिष्ठा, सर्वकाही दिलयं.मी लढत राहणार.संसद किंवा बाहेर असलो तरी मी माझं काम करणार. संसदेत आत किंवा बाहेर असणं महत्त्वाचं नाही.पण मी काम करतच राहणार. देशाच्या न्यायव्यवस्थेवर मला विश्वास आहे.मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी सावरकर नाही. माझ नाव गांधी आहे सावरकर नाही असा निशाणा आज केंद्र सरकारवर राहुल गांधी यांनी लगावला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशात लोकशाहीवर आक्रमण सुरु आहे.लोकसभेत बोलण्याची परवानगी मागितली. मला परवानगी दिली नाही.भाजपकडून लोकांना भरकटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खरं बोलणं माझ्या रक्तात आहे. अदानींना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.भाजपच्या मते अदानांवर संकट म्हणजे देशावर संकट. 20 हजार कोटींची चौकशी व्हायला हवी.अदानी भ्रष्ट आहेत, हे जनता जाणते.मग पंतप्रधान मोदी अदानींना का वाचवत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
भाजपचे नेते नरेंद्र मोदींना घाबरतात. माझ्या पुढच्या भाषणाला घाबरूनच माझ्यावर कारवाई करण्यात आली. मी विचार करूनच प्रश्न विचारतो.त्यामुळे खासदारकी गेली म्हणून मी घाबरणार नाही. मी काम करतचं राहणार. लवकरच मी वायनाडच्या जनतेला मी पत्र लिहणार आहे.खासदारकी रद्द केली तरी मला फरक पडत नाही.जे चुकलेत ते दुसऱ्याचं लक्ष विचलित करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि अदानींचे संबंध जगासमोर आणणार असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
Related Posts
Add A Comment