ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँगेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm narendra modi) हल्लाबोल केला आहे. बुधवारी गोपालपुरामध्ये काश्मिरी पंडित (kashmir pandit) महिला शिक्षिकेची हत्या करण्यात आली. यावर बोलताना राहुल गांधी यांनी पाच महिन्यांत १५ सुरक्षा कर्मचारी आणि १८ नागरिक मारले गेले, पंतप्रधान महोदय! हा चित्रपट नसून काश्मीरचे सत्य आहे, असे म्हणतं निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, काश्मीरमध्ये गेल्या पाच महिन्यांत १५ सुरक्षा जवान शहीद झाले आणि १८ नागरिक मारले गेले. कालही एका शिक्षकाची हत्या झाली. तर काश्मिरी पंडित १८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

जम्मू-काश्मीर खोऱ्यात सातत्याने काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून त्यांची हत्या होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, “काश्मिरी पंडित १८ दिवसांपासून धरणे धरत आहेत, पण भाजप ८ वर्षे पूर्ण झालीत याचा आनंद साजरा करण्यात व्यस्त आहे.”
खरं तर, मंगळवारी कुलगाममध्ये हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा खोऱ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पंतप्रधान महोदय, हा चित्रपट नाही, वस्तुस्थिती आहे
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काश्मीरमध्ये गेल्या पाच महिन्यांत १५ सुरक्षा जवान शहीद झाले आणि १८ नागरिक मारले गेले. कालही एका शिक्षकाची हत्या झाली आहे. काश्मिरी पंडित १८ दिवसांपासून धरणे धरत आहेत, पण भाजप ८ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात व्यस्त आहे. पंतप्रधान महोदय, हा चित्रपट नाही, हे आजच्या काश्मीरचे वास्तव आहे.
शाळेत जात असताना झाला खून
रजनी बाला नेहमीप्रमाणे मुलांना शिकवण्यासाठी शाळेत निघाल्या होत्या. त्या शाळेच्या परिसराजवळ पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक रजनी जमिनीवर पडल्या. यानंतर स्थानिक लोक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर त्याचवेळी बंदुकीचा आवाज ऐकून अनेक शाळकरी मुले बेशुद्ध झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलही घटनास्थळी पोहोचले. परंतू हल्लेखोर पसार झाले होते.