Raj Thackeray : बीडच्या परळी न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अटक वॉरंट रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रत्यक्ष हजर झालेले राज ठाकरे यांनी अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. यानंतर न्यायालयाने 500 रुपयांचा दंड ठोठावत अटक वॉरंट रद्द केले. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बीडच्या परळी न्यायालयाकडून अजामीपात्र वॉरंट बजावलं होतं,वेळोवेळी त्यांना समन्य बजावलं होत. याआधी तिन सुनावणी दरम्यान राज ठाकरे गैरहजर राहिले होते.
आज राज ठाकरे परळीत दाखल झाले होते. परळी कोर्टात झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द झालं. त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरेंच्या परळी दौऱ्यानिमित्त मनसेकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच, गोपीनाथ गड असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीचे सरपंच सुशील कराड यांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी १० क्विंटल आणि ५० फुट फुलांचा हार तयार केला होता.राज ठाकरेंवर आज परळीत जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.
काय आहे प्रकरण
राज ठाकरेंना 2008 मध्ये मुंबईतअटक केली होती.
-राज ठाकरेंच्या अटकेचे पडसाद बीडमधल्या परळीतही उमटले.
-परळीतील धर्मापुरी कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती.
-याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर, चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता.
-चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.
Previous Articleजमिनीसाठी पुतण्याने चुलत्यावर केला चाकूने वार
Next Article दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यास महिलांना दुप्पट पगारवाढ
Related Posts
Add A Comment