Sambhajiraje chhatrapati : माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती हे एका कार्यक्रमानिमित्त आज बेळगावकडे जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव संभाजी राजे छत्रपती यांना कर्नाटक सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. कर्नाटक राज्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून ते कर्नाटक राज्याच्या हद्दीतून बाहेर जाईपर्यंत ही सुरक्षा असणार आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनीच ही माहिती दिली. त्यावर ते बोलताना म्हणाले की, मला कर्नाटक पोलिसांकडून फोन आला होता. तुम्हाला आमची वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचे सांगितले. कर्नाटक पोलिसांनी सहकार्य करण्याचे सांगितले असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
हेही वाचा- Sambhaji Raje : ऐतिहासिक चित्रपट पहिल्यांदा महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांना दाखवावा, मगच परवानगी द्यावी
कर्नाटकचे लोक आपलेच आहेत
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून बेजबाबदार वक्तव्य आल्याने तणाव झाला. त्यामुळे आंदोलन होऊन आपल्या गाड्या फोडल्या. कर्नाटकात भाजप आहे. केंद्रात भाजप आहे. त्यावर तोडगा काढून न्याय द्यावा. कर्नाटकातील माणसं देखील आपलीच आहेत, असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले.
Previous ArticleSatara News : ट्रक्टरची टाकी फुटून आगीचा भडका ,चालक गंभीर जखमी
Related Posts
Add A Comment