बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी गुरुवारी सायंकाळी समर्थनगर भागात प्रचारफेरी काढली. जुना पीबी रोड येथील रेणुका मंदिर येथे देवीचे पूजन करून समर्थ नगर भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

यावेळी समर्थनगर भागातील कार्यकर्त्यांनी अमर येळ्ळूरकर यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. माfहलांनी औक्षण केले तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी अमर येळ्ळूरकर यांच्या विजयाच्या घोषणा देत संपूर्ण समर्थनगर परिसर दणाणून सोडला. संपूर्ण समर्थनगर पारिसरात समितीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

प्रचार फेरीमध्ये संयुक्त समर्थ नगर युवक मंडळ शिवजयंती युवक मंडळ, बाल शिवराय युवक मंडळ, पंचम मंडळी, सामर्थ्य माfहला मंडळ, रेणुका देवी माfहला मंडळ यासह इतर माfहला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुरली जांगले, वसंत हलगेकर ,संजय राऊत, बाळू किल्लेकर ,संजय पाटील, महेश पाटील ,प्रकाश पाटील ,रवींद्र हुलजी, संजय चतुर, मारुती कोंडुसकर तसेच राम कटारे, मंजुनाथ पालटेकर, विनायक हुलजी, सुनील सुभेदार, निखिल वराळे, राधेश शहापूरकर, पवन शिरोडकर, तसेच माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांच्यासह कार्यकर्ते महिला ज्येष्ठ नागाfरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.