सीईएन पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव
आम्ही एसीबी अधिकारी आहोत, तुम्ही तातडीने आमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करा, अन्यथा कार्यालयात येऊन धाड घालून कारवाई करू असे सांगून पैसे उकळणाऱया तिघा तोतया एसीबी अधिकाऱयांना अटक करण्यात आली आहे. सीईएन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुर्ग्याप्पा निंगाप्पा पुजार (वय 56, रा. सदलगा, चिकोडी), राजेश बापुसो चौगुले (रा. बस्तवाड-शिरोळ, कोल्हापूर), रजणीकांत नागराज (रा. मुगळी, सकलेश्वरपूर, हासन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही आरटीओ, महसूल विभागातील अधिकाऱयांना तसेच उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱयांना फोन करून धमकी देत होते.
सीईएन पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी सापळा रचून या तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हे तिघेही अनेक अधिकाऱयांना धमकी देत होते. आमच्या अकाऊंटला पैसे घाला अन्यथा तुमच्या कार्यालयात धाड टाकून कारवाई करू, अशी धमकी देत होते. त्यानंतर काही जणांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सीईएन पोलिसांनी चपे फिरवून या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.