प्रतिनिधी / खानापूर : आज सायंकाळी पाच वाजता जांबोटी बस स्थानक जवळ मोठा ट्रक दुसऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडला. त्यामुळे बेळगाव – जांबोटी – गोवा रस्त्यावर तासभर वाहतूक खोळंबली होती. खानापूर पोलिसांनी तात्काळ क्रेन मागवून हा ट्रक रस्त्यावरून हटवला. वाहतूक सुरळीत करत असतानाच कुसमळी पुलावर पुन्हा एक टेम्पो बंद पडल्याने वाहतूक जाम झाली. ही वाहतूक पुन्हा जवळजवळ दीड तास खोळंबली होती जांबोटी येथील तरुण कार्यकर्त्यांनी ही वाहतूक मोकळी करण्यास प्रयत्न केले. त्यामुळे एकेरी वाहतूक सरु झाली.
Related Posts
Add A Comment