कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर आमदारांसह आता खासदारही शिंदे गटात सामील होत आहेत. काल १२ खासदार शिंदे गटात सामील झाले. यात कोल्हापूरचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे देखील सामील झाले आहेत. हळूहळू शिवसेनेला खंडार पडायला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही कट्टर शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या पाठिशी आहेत. याचा प्रत्यय काल आला आहे. चक्क कोल्हापूर जिल्ह्यातील एका शिवसैनिकाने (Shiv Sainik) स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय. हातकणंगले तालुक्यामधील टोप येथील सूरज पाटील असे त्याचे नावं आहे. या शिवसैनिकाच्या पत्राची परिसरात चांगलीच चर्चा रंगलीय.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सूरज पाटील (Suraj Vilas Patil) या शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं सांगत त्याने ते पत्र जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Muralidhar Jadhav) यांच्याकडं दिलंय. हे पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडं पाठविण्यात येणार आहे. या शिवसैनिकाच्या पत्राची परिसरात चांगलीच चर्चा रंगलीय.
हेही वाचा- कोकण-गोवा, विदर्भात पावसाचा जोर
शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर नेत्यांच्या कोलांटउड्या इकडून तिकडं सुरु असल्या, तरी निष्ठावंत शिवसैनिक मात्र हे उघड्या डोळ्यानं पाहत आहे. मातोश्रीवरील शब्द शिरसावंद्य मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा शिवसैनिक शिवसेनेत चाललेल्या घडामोडीत चांगलाच भेदरून गेलाय. आपला नेताच शिंदे गटात गेल्याने कार्यकर्ता बिथरला आहे.
Previous Articleबेळगाव-सांबरा रस्त्याचे रुंदीकरण करा
Next Article श्रीगणेश विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
Related Posts
Add A Comment