नवी दिल्ली : येत्या शनिवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या महिलांच्या पहिल्याच टी-20 प्रिमियर लिग स्पर्धेच्या अधिकृत नामकरण केलेल्या ‘शक्ती’ शुभंकराचे अधिकृत अनावरण बीसीसीआयचे सचिव जयेश शहा यांच्या हस्ते गुरुवारी येथे करण्यात आले. महिलांच्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेच्या शुभंकराचे नामकरण शक्ती असे घोषित करण्यात आले असून खेळाडूंच्या निळ्या रंगाच्या जर्सीवर वाघिणीशी अनुरुप शक्ती हे शुभंकर आहे. या स्पर्धेमध्ये पाच संघांचा समावेश राहिल. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंटस्, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि युपी वॉरियर्स हे संघ जेतेपदासाठी लढत देतील. शनिवार दि. 4 मार्च रोजी या स्पर्धेला नव्या मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. गुजरात जायंटस् आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना खेळवला जाईल.
Previous Articleकेखलेची सुप्रिया शिंदेला पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश
Next Article भाजपचा ‘ईशान्य’ प्रभाव
Related Posts
Add A Comment