World Smile Day 2022 : ऑफिसचे काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, तणावामुळे आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. आणि झालेले परिणाम कमी करण्यासाठी औषधांचा भडिमार केला जातो. किंवा मग व्यायाम, वेगवेगळ्या सप्लीमेंटचा आधार घेतला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या चेहऱ्यावरील एक स्माईल तुमचे टेन्शन कमी तर करतेच शिवाय तुम्हाला आनंदाही ठेवण्यास मदत करते. तुम्ही लाफिंग थेरपीबद्दल खूपदा ऐकले असेल. हसण्याला सर्वोत्तम औषध म्हटले आहे. म्हणूनच आजच्या या स्पेशल स्माईल डे निमित्त आपण हसण्याचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.
हसणे तुम्हाला दीर्घकाळ तरूण ठेवते
जे लोक नेहमी हसत असतात आणि आनंदी असतात ते इतर लोकांपेक्षा जास्त तरुण राहतात. हसण्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. चेहऱ्याचा लालसरपणा वाढतो. म्हणजे नेहमी तुम्ही फ्रेश दिसता.
चांगली झोप लागते
हसण्यामुळे स्नायूंच्या व्यायामासोबत शरीरालाही आरामही मिळतो. हसण्याने शरीर अनेक प्रकारच्या वेदनांपासून दूर राहते. तुम्ही खूप दु:खी असाल त्या दिवशी चांगल्या गोष्टी आठवून स्माईल करा. तुमचे टेन्शन कमी होवून झोप चांगली लागेल.
हसल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
अनेक संशोधनातून हे देखील सिद्ध झाले आहे की, हसण्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. ज्यामुळे शरीर आजारांपासून वाचते आणि तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता.
हसल्याने तणावापासून आराम मिळतो
हसण्याचा मनावरही सकारात्मक परिणाम होतो. हसल्याने स्मरणशक्ती मजबूत राहते. जे लोक खूप हसतात ते तणावापासून दूर राहतात.
हसणे तुम्हाला सकारात्मक ठेवते
हसण्यामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे व्यक्ती दिवसभर सकारात्मक राहते. हा हार्मोन मूड फ्रेश करण्यास मदत करतो.
Trending
- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जबाबदारीपूर्वक काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर
- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन
- ‘सेंट्रल हायस्कूल 1988 बॅच वर्गमित्र’कडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
- जेजुरीत ग्रामस्थांचे आंदोलन तीव्र
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जयसिंगपूरात निवासी वसतीगृह होणार; राजू शेट्टींची घोषणा
- आपल्याच आमदारांना सांभाळण्यासाठी सरकारकडून हवे तसे लाड ; आमदार शशिकांत शिंदे
- Sangli Breaking : सांगलीत कर्मचाऱ्यांना बांधून गोळीबार करत घातला दरोडा, रिलायन्स ज्वेलरी दुकानातील घटना
- उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करुन जेजुरीकरांना न्याय मिळवून देऊ, राज ठाकरेंचे आश्वासन