|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » झाकीर नाईकची देशभरात 37 ठिकाणी बेनामी संपत्ती

झाकीर नाईकची देशभरात 37 ठिकाणी बेनामी संपत्ती 

प्रतिनिधी/ मुंबई

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक आणि त्याची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, देशातील 37 ठिकाणी त्याची बेनामी संपत्ती असल्याची धक्कादायक मा]िहती समोर आली आहे. एकटय़ा मुंबई शहरात त्याचे 25 फ्लॅट्स असल्याची माहिती ईडीने दिली  आहे. गेल्या शुक्रवारी ईडीने झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेविरोधात अवैध संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

बांगलादेशात दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. शिवाय भारतातही हे चॅनेल बंद केले होते. चौकशीअंती पेंद्रीय मंत्रिमंडळाने या संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबई पोलिसांसह एनआयए, एटीएस, ईडी झाकीरच्या संस्थेवर नजर ठेवून आहेत.

एनआयएने याप्रकरणी युएपीए कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल करत संस्थेच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. झाकीरची अवैध संपत्ती असल्याचे निदर्शनास येताच, ईडीने झाकीर आणि आयआरएफविरोधात पीएमएलए कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यांतर्गत कोटय़वधी रुपयांचा आर्थिक व्यवहार, संस्थेला आलेला फंड, केलेला खर्च या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने चौकशी केली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत झाकीर आणि त्याच्या आयआरएफ संस्थेची देशातील विविध 37 ठिकाणी अवैध संपत्तीr असल्याचे समोर आले आहे. तर मुंबईत 25 फ्लॅट्स असल्याची माहितीही समोर आली आहे.