|Monday, October 22, 2018
You are here: Home » Top News » पुण्यात 14 वर्षीय मुलगा चेंबरमध्ये पडून बेपत्ता

पुण्यात 14 वर्षीय मुलगा चेंबरमध्ये पडून बेपत्ता 

ऑनलाईन टीम / पुणे  : 

पुण्यातील दांडेकर पुलाजवळ असलेल्या आंबील वाडा येथे एक 14 वर्षाचा मुलगा गटाराच्या चेंबरमध्ये पडून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश किशोर चांदणे असे या मुलाचे नाव असून अग्निशमन दलाचे जवान गेल्या काही तासांपासून मुलाला शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण आद्यापि काहीच पत्ता लागू शकलेला नाही.

अंबील वाडा हा झोपडपट्टी भाग असून याच भागातून जाणाऱया नाल्यात हा मुलगा पडला आहे. या नाल्याच्या भींतीची पडझड झाली आहे. तिथे नेमका चेंडू गेल्याने तो बाहेर काढण्यासाठी हा मुलगा धडपडत होता . त्याचवेळी तोल जाऊन नाल्यात पडला आणि सांडपाण्याच्या प्रवाहाबरेबर वाहत जाऊन चेंबरमध्ये गेला. त्यानंतर त्याचा काहीच शोध लागू शकलेला नाही.

 

 

Related posts: