|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » Top News » तक्रार करणाऱया ‘त्या’ जवानावर लष्कराकडून कारवाई

तक्रार करणाऱया ‘त्या’ जवानावर लष्कराकडून कारवाई 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सीमेवर तैनात असलेल्या जवानांना खराब अन्न देण्यात येत असल्याची तक्रार करणाऱया सीमा सुरक्षा दलाचा जवान तेज बहादुर यादव यांच्यावर कारवाई करत त्यांना प्लंबिंगची कामे देण्यात आली आहेत.

बीएसएफचे जवान तेज बहादुर यांनी एक व्हिडिओ जारी करत सीमेवर तैनात असलेल्या जवानांना खराब अन्न दिल्याची तक्रार केली. त्यांच्या या व्हिडिओने देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या व्हिडिओची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तेज बहादुर यांनी जारी केलेल्या व्हिडिओमधून जे आरोप केले, ते आरोप लष्कराने खोडून काढले. त्यानंतर आज अखेर लष्कराने जवान तेज बहादुर यांच्यावर कारवाई करत त्यांना शिक्षा म्हणून प्लंबिंगची कामे दिली आहेत.

Related posts: