|Thursday, July 27, 2017
You are here: Home » क्रिडा » बुचार्ड, स्ट्रायकोव्हा, कोन्टा उपांत्य फेरीतबुचार्ड, स्ट्रायकोव्हा, कोन्टा उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ सिडनी

कॅनडाच्या युजीन बुचार्डने गेल्या दहा महिन्यांत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत स्थान मिळविताना येथे सुरू असलेल्या सिडनी इंटरनॅशनल महिला टेनिस स्पर्धेत रशियाच्या ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हाचा पराभव केला.

बुचार्डने पॅव्हल्युचेन्कोव्हावर 6-2, 6-3 अशी मात केली. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला ब्रिटनच्या जोहाना कोन्टाशी होईल. यापूर्वी गेल्या वर्षी मार्चमध्ये बुचार्डने मलेशियन ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. कोन्टाने रशियाच्या दारिया कॅसात्किनाचा 6-3, 7-5 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात कॅरोलिन वोझ्नियाकीला बार्बरा स्ट्रायकोव्हाकडून 7-5, 6-7 (6-8), 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. अतिउष्ण हवामानामुळे दोघींच्या तळपायाला फोड आले, त्यावर उपचार करून घेतल्यानंतर सामना पूर्ण केला. स्ट्रायकोव्हाची उपांत्य लढत ऍग्निस्का रॅडवान्स्का किंवा डुआन यिंगयिंग यापैकी एकीशी होईल.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!