|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » ‘जिओ’ घरगुती उत्पादन क्षेत्रात उतरणार

‘जिओ’ घरगुती उत्पादन क्षेत्रात उतरणार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ग्राहकांना आयुष्यात अधिक सेवा देणाऱया उत्पादन क्षेत्रात उतरण्याचा रिलायन्स जिओचा प्रयत्न आहे. या उत्पादनांमध्ये घर, कार यासारख्या सेवांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने पुढील एका वर्षाच्या आत बाजारात सादर करण्यात येतील असे सांगण्यात आले.

ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याविषयी अनेक जणांनी विचारही केलेला नाही, अशा सेवा देण्यात येतील. कंपनी यासाठी आपल्या मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ही उत्पादने सहजपणे मिळत नाही असे कंपनीच्या अधिकाऱयाने सांगितले. कंपनी घरात स्मार्टफोनच्या माध्यमातून समस्या निवारणाचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून घरावर नजर ठेवणे सोपे जाईल. घराचा दरवाजा कार्यालयात बसून बंद अथवा उघडता येईल.

कारला स्मार्ट करणाऱया उपकरणाचाही समावेश आहे. यूएसबीप्रमाणे असणाऱया या उपकरणामुळे कारची सर्व माहिती स्मार्टफोनमध्ये मिळेल. कारच्या बॅटरीची अवस्था, इंधन पातळी, कार चोरीस गेल्यास ट्रकिंगची सोय यामध्ये असेल. या व्यतिरिक्त जिओ मनीच्या सहाय्याने सर्व देयके देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Related posts: