|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी केला सूर्यनमस्कार

तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी केला सूर्यनमस्कार 

ऑनलाईन टीम / नाशिक :

सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. हे अनेकदा आपण ऐकले असेल आणि ते सिद्धही झाले आहे. सुदृढ आरोग्यासाठीची ही गरज ओळखून नाशिकमधील तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केला.

suryanamskar

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्काराचे आयोजन केले होते. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षणसंस्था गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांबरोबर आरोग्याकडेही लक्ष देत आहे. त्यामुळे या शिक्षणसंस्थेने विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्काराचे आयोजन केले. या सूर्यनमस्कारासाठी शहरातील शाळांनीही आपला सहभाग नोंदवला. यामध्ये 25 शाळा सहभागी झाल्या होत्या. या 25 शाळांमधून तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारही केला. या सूर्यनमस्काराची संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे.