|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘पारदर्शक’ कारभाराचा भाजपाचा ‘वचननामा’

‘पारदर्शक’ कारभाराचा भाजपाचा ‘वचननामा’ 

सोलापूर / वार्ताहर

सोलापूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तनाची हाक दिलेल्या भाजपाने बुधवारी आपल्या पक्षाचा वचननामा प्रसिध्द केला. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदींच्या उपस्थित पक्षाचा हा वचननामा प्रसिध्द करण्यात आला.

भाजपाचे निवडणूक कार्यालय असलेल्या शांतीसागर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, रघुनाथ कुलकर्णी, दत्तात्रय गणपा, रामचंद्र जन्नू, प्रभाकर वनकुद्रे, मोहन डांगरे, विश्वनाथ बेद्रे, शहराध्यक्ष प्रा. अशोक निबर्गी आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूरची महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. पण, जनतेला अजूनही अनेक समस्या भेडसावत आहेत. जनतेने आता येत्या महापालिका निवडणूकीत भाजपाला सत्ता द्यावी. महापालिकेची सत्ता हाती आल्यास भाजपा पालिकेचा पुर्णपणे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार देईल. पालिकेचा कारभार अधिकाअधिक विकेंद्रीत करण्यावर आमचा भर असेल. विभागीय कार्यालयावर अधिक जबाबदारी टाकून त्यांना अधिक अधिकार देण्यात येतील. पालिकेच्या कारभारात जनतेचा सहभाग वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील. पालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना जनतेच्या सुचना मागविल्या जातील आणि त्यातील सुचनांचा समावेश अंदाजपत्रकात केला जाईल असे अभिवाचन भाजपाने आपल्या वचननाम्याच्या माध्यमातून मतदारांना दिले आहे.

वचननाम्यामध्ये स्मार्टसिटीला प्राधान्य दिले असून इंदिरा गांधी स्टेडियमच्या गॅलरीवर छत टाकून सौर उर्जा तयार करणारी यंत्रणा बसविणे, शहरातील खाजगी, सरकारी आणि निमसरकारी इमारतीवर पावसाचे पाणी अडविण्यासाठी ते जमीनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविण्यात येणार, ई-टॉयलेट, रात्रीचा बाजार, पालिकेच्या सर्व सुविधा ऑनलाईन शहरात मोफत वायफाय सुविधा आणि स्मार्ट सीटीतील सार्वजनिक वितरणचे जाळे पुर्णपणे भूमिगत करण्यावर भर देण्या बरोबरच पालिकेच्या जाचक अटी व पोटनियमाचे पुनरावलोकन करण्यात येणार आणि उद्योग व व्यावसायांना पूरक सेवा सुविधा माफक दरात देण्यात येणार असल्याचा उल्लेख या वचननाम्यात करण्यात आला आहे.

शहरातील पिण्याच्या पाण्यालाही वचननाम्यात प्राधान्य देण्यात आले असून सोलापूरच्या जलस्त्रोतांचा विस्तार आढावा घेऊन कमीत कमी श्रमात आणि कमी खर्चात आणि पभावीरित्या जास्तीत जास्त शुध्द पाणी पुरवठा करण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. सार्वजनिक आर ओ प्लॅन्ट बसवून फिल्टर्ड पाणी नाममात्र किमतीत उपलब्ध करून देण्यात येईल. हिप्परगा तलावात कसलेही प्रदुषण नाही या तलावातील गाळ काढुन शहराचा पाणी पुरवठा शतप्रतिशत करण्यात येईल. पाण्याचे ऑडीट बारकाईने केले जाईल, उद्योगांना पिण्याच्या पाण्याच्या दरात पाणी पुरवठा करण्याचाही उल्लेख या वचननाम्यात करण्यात आला आहे.

शहरातील रस्त्यांनाही प्राधान्य देण्यात आले असून गावठाण क्षेत्रातील रस्ते वाहतुकीच्या मानाने अरूंद आहेत ते रूंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. शहरातल्या प्रमुख मार्गावर आणि चौका चौकात वाहतुक बेटे तयार करणे, त्याचे सुशोभिकरण करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, गरजेनुसार उड्डान पुल बांधणे आणि भुयारी रस्ते बांधण्यात येणार असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

कचरा मुक्त सोलापूरलाही भाजपाने वचननाम्यात प्राधान्य दिले असून सोलापूर शहर अधिकाअधिक स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. शहर आणि हद्दवाढ भागात गटारी तुंबणे आणि सांडपाणी रस्त्यावर येऊन त्याची दुर्गंधी सुटणे असे प्रकार नेहमी घडतात. त्यासाठी अधिक रूंद नाले आणि भूमीगत गटारींची सोय करण्याची गरज आहे. विविध योजनेच्या माध्यमातून ही कामे त्वरीत केली जातील. कचऱयापासून सेंद्रीय खत निर्मिती आणि वीज निर्मिती करण्याच्या योजना राबविल्या जातील. यासाठी मनपाची स्वंतत्र यंत्रणा तयार केली जाईल. शहर धुळ आणि प्रदुषणापासून मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवंर्धनाची मोहीम राबविण्यात येईल असे अभिवचनही या वचननाम्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

भाजपाने आपल्या वचननाम्यात भाजी मंडई, स्वच्छतागृहे, पर्यटन विकास, वस्तू संग्रहालय, सांस्कृतिक विकास, महापौर निर्मिती, मैदाने आणि पिंडागणेव उद्याने विकास, निरोगी सोलापूर, रूग्णासाठी मदत, परिवहन सेवा, बवस्थानक आािण् आधुनिक बसपोर्ट, स्मशानभूमी सुधारणा, व्यापर संकुले, शिक्षण आणि बचत गट यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

Related posts: