|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » निकालाच्या निमित्ताने शहरात चोख बंदोबस्त

निकालाच्या निमित्ताने शहरात चोख बंदोबस्त 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर महानगरपालीका आणि दक्षिण व उत्तर सोलापूर पंचायत समिती निकालाच्या पार्श्वभूमिवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. एकूण तीन ठिकाणी मतमोजणी होणार असून, यासाठी 1300 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी बुधवारी येथे दिली.

महानगरपालीका आणि पंचायत समितीची निवडणूक किरकोळ घटना सोडल्यास शांततेत पार पडले आहे. तसेच निकालाच्या दिवशी शहरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त करण्यात आले आहे. गुरूवारी एकून तीन ठिकाणी मतमोजणी होणार आहे. महानगर पालिका निवडणूकीची मतमोजणी रामवाडी गोडाऊन येथे होणार आहे. तर दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गट आणि गणाची मतमोजणी गावडे मंगल कार्यालय आणि उत्तर सोलापूर पंचायत समितीचे रंगभवन येथे होणार आहे. रंगभवन व गावडे मंगल कार्यालय येथे प्रत्येकी एक सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले आहे. तसेच रामवाडी येथील मतमोजणी कार्यालयात पोलीस अधिक्षक नामदेव चव्हाण हे बंदोबस्तला असणार आहेत, अशी माहिती सेनगावकर यांनी दिली.

सेनगावकर म्हणाले, शहरात एकूण 6 सहाय्यक पोलीस आयुक्त, 3 पोलीस अधिक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरिक्षक, 25 पोलीस निरिक्षक आणि 100 पोलीस उपनिरीक्षकांसह 1300 पोलीस कर्मचारी बंदोबस्तसाठी असणार आहेत. काही संवेदनशिल प्रभागात पोलीस कर्मचारी सकाळपासूनच डय़ूटीवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मतमोजणीच्या तिनही ठिकाणी सीआयपीएफचे जवाण असणार आहेत. या व्यतिरिक्त शहरात सध्याकाळपर्यंत पेट्रोलिंग सुरू असणार आहे. संपूर्ण शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली आहे. बंदोबस्तसाठी असणाऱया पोलीस कर्मचाऱयांना त्या त्या ठिकाणी जेवणाचे पॅकेट आणि पाण्याचे बाटल्या पुरविण्यात येणार आहे, याकडेही रवींद्र सेनगावकर यांनी लक्ष वेधले.

सोलापूर शहराकडे सर्वांचे लक्ष होते. मतदान शांततेत पार पडले. मी सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो. निवडणूकीत कोणीतरी जिंकरणारच आणि कोणीतरी हरणार हे निश्चित आहे. पण यामध्ये द्वेष आणि मनभेद होता कामा नये, असे भावनिक आवाहन सेनगावकर यांनी केले. ते म्हणाले, निवडणूक जिंकणाऱयाने विजयी डोक्यात घेवून मिरवू नये. विजयी उमेदवाराने स्वताःवर काही निर्बंध घालून घेतले पाहिजे. तसेच अपयश आलेल्या उमेदवाराने लगेच खचून जावू नये. नव्या उमेदाने कामाला लागा. विजयी मिरवणूकीला कोणालाही परवाणगी दिली जाणर नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लोकशाही प्रक्रियेत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत आणि अभिनंदन.

उद्याच्या मतमोजणीसाठी व्यापक पोलिसांचा बंदोबस्त असून आपापल्या कार्यकर्त्यांना गोंधळ न घालण्याचा आवाहन करावे. विनाकारण गुन्हे घडतील असे कृत्य न करण्यास सांगावे, असे आवाहन सेनगावकर यांनी उमेदवारांना केले आहे.

Related posts: