|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जनतेत पोलिसाबददल ‘विश्वास’ निर्माण होणार का ?

जनतेत पोलिसाबददल ‘विश्वास’ निर्माण होणार का ? 

पंढरपूर :

जिल्हयातील ग्रामीण पोलिसांमधे असलेली मरगळ बाजूला काढण्यासाठी चक्क आजपासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील सोलापूर दौ-यावर आहेत. यानिमित्ताने नांगरे पाटील हे सोलापूर जिल्हयातील पोलिसांच्या कार्याची तपासणी करणार आहेत. त्यांच्या या दौ-यांमधे  जनतेमधे पोलिसाबददल ‘ विश्वास ’ निर्माण करणार का ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

विश्वास नांगरे पाटील हे तरूणांचे तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचे देखिल आयडॉल आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राला ब-याच दिवसापासून एक तरूण आणि धडाडीचे महानिरिक्षक लाभले आहेत. अशा स्थितीमधे सामान्य पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखिल सुखावला आहे. मात्र यामधे ‘ आयडॉल ’ असणा-या अधिका-यांच्या क्षेत्रातील तळापर्यतचे अधिकारी आणि कर्मचारी तितक्या तत्परतेने काम करतात का ? हा जरी मुख्य प्रश्न असला. तरी काही अधिकारी आणि कर्मचारी चांगल्या पध्दतीने काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. मात्र व्यवस्थेमधील काही कुप्रवृत्तीमुळे इतरही अधिकारी आणि कर्मचारी काम करू शकत नाहीत. असा सर्वत्रच आरोप होतो. यासाठी पोलिस प्रशासनाचे मनोबल वाढवत असताना. व्यवस्थेतीतील मानसिकतेचा देखिल अभ्यास करून काही परिवर्तन जर घडले. तर ते नक्कीच कौतुकास्पद ठरेल.

Related posts: