|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाणी टंचाईत शासन यंत्रणा उदासिन : सत्यजित देशमुख

पाणी टंचाईत शासन यंत्रणा उदासिन : सत्यजित देशमुख 

प्रतिनिधी/ शिराळा

उत्तर विभागातील पाणी टंचाई बाबत शासन यंत्रणा उदासिन असून प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिराळा तहसिल कार्यालयावरील मोर्चात शेतकरी, ग्रामस्थ, महिला तसेच युवकांनी मोठय़ा सख्येंने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.

    वाकुर्डे बुदूम, वाकुर्डे खुर्द, अंत्री बुद्रूक, अंत्री खुर्द, पाडळेवाडी ता. शिराळा येथील पाणी टंचाई बाबत माहीती जाणून घेण्यासाठी आयोजीत ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिराळा पंचायत समितीचे सभापती सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, के.डी.पाटील आदी उपस्थित होते.

   यावेळी सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले, उत्तर विभागातील अनेक गांवात तीव्र पाणीटंचाई आहे. पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील अनेक गांवाना गेल्या आठ दिवसांच्या पासून पिण्याचे पाणीच आलेले नाही. महिला वर्ग तसेच युवक व ग्रामस्थांचे प्रचंड हाल उठले आहे. वारणा धरणाचे पाणी करमजाई धरणात सोडणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत असताना शासन बघ्याची भूमीका घेत आहे. त्यांना जनतेला होणाऱया त्रासाचे कसलेही गांभीर्य नाही. झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिराळा येथे दिनांक 7 रोजी तहसिल कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठय़ा संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे.

    यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, करमजाई धरणातील पाण्याने तळ गाठला असल्याने या पाण्यावरती अवलबूंन असणाऱया गांवाचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरात येणाऱया गांवाच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणे फारच आवश्यक व गरजेचे आहे. हे प्रशासनाला दिसत नाही. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू असे आवाहन माजी आमदार नाईक यांनी केले.

   यावेळी हिंदूराव बसरे, तानाजी जाधव, भिमराव पाटील, शातांराम जाधव, सुरेश  माने, बंडा पाटील, गजानान पाटील, वसंत शेटके, शामराव दळवी, राजेंद्र जंगम, नाना वाघ, मोहन माने, नामदेव पडवळ, साधू पाटील, डॉ. अजय पाटील, शामराव जाधव, डॉ. राजाराम पाटील, बाळासाहेब पाटील, दिपक जाधव, जयकुमार पाटील, विश्वास परिट, सजंय गुरव, संजय पाटील, देवेंद्र पाटील, नारायण चव्हाण, गोरख पाटील यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठय़ा सख्येंने उपस्थित होते.