|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुंभार हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा

कुंभार हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा 

कोल्हापूर /

शैक्षणिक वर्ष 2016-17 च्या एस.एस.सी. परीक्षेस प्रविष्ठ होणाऱया विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल, आर. के. नगर येथे नुकताच पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजरा तालुका शेतकरी सह. सूतगिरणीचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस, नानासाहेब नष्टे, संस्थेचे सेक्रेटरी सतीश घाळी, उपाध्यक्ष एम. ए. पवार, संचालक निर्मळे, कारदगे, स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक गुरव, मुख्याध्यापिका इथापे, पर्यवेक्षक आर. बी. पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर फडणीस म्हणाले, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास जपून एकाग्रता वाढवावी. सकारातून यश मिळते. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सतीश घाळी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापिका इथापे यांनी तर सूत्रसंचालन व्ही. पी. बिर्जे यांनी केले. आभार परकाळे यांनी मानले.

Related posts: