|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » मँचेस्टर युनायटेड उपांत्यपूर्व फेरीत

मँचेस्टर युनायटेड उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

युफा युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गुरूवारी येथे झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेड एफ सी संघाने एफ सी रोस्टोव्ह संघावर सरासरी 2-1 असा विजय मिळविला.

गुरूवारी झालेल्या चुरशीच्या परतीच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडतर्फे जुआन माटाने सामना संपण्यास 20 मिनिटे बाकी असताना शानदार गोल नोंदवित आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. मँचेस्टर युनायटेडने सरस सरासरीच्या जोरावर एफ सी रोस्टोव्हचा  2-1 असा पराभव केला. 1985 नंतर प्रथमच मँचेस्टर युनायटेड क्लबने युरोपच्या या दुसऱया क्लब स्थरावरील स्पर्धेत शेवटच्या आठ संघात स्थान मिळविले आहे. मात्र गुरूवारच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा हुकमी फुटबॉलपटू पोग्बा जखमी झाला आहे. मँचेस्टर युनायटेड संघाने यापूर्वी एकदाही युरोपा लीग फुटबॉल स्पर्धा जिंकलेली नाही.

या सामन्यात सुरूवातीला रोजोचा हेडरद्वारे मारलेला फटका गोलरक्षक मेदव्हेदेवने थोपविला. 47 व्या मिनिटाला मँचेस्टरचा पोग्बा जखमी झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. 70 व्या मिनिटाला माटाने मँचेस्टरचा महत्वाचा गोल नोंदविला.