|Thursday, June 22, 2017
You are here: Home » leadingnews » यूपीत मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडय़ा नाहीत ; मुख्यमंत्र्यांचे आदेशयूपीत मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडय़ा नाहीत ; मुख्यमंत्र्यांचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांमध्येच नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडय़ा न वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील नवनिर्वाचित मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडय़ांचा ‘योग’ टळणार असल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना संपत्ती जाहीर करण्याचे नुकतेच आदेश जारी केले आहेत. त्यानंतर त्यांनी आता मंत्र्यांना लाल गाडय़ा न वापरण्याचे आदेश दिले. दरम्यान, पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी देखील अशाच प्रकारच्या सूचना केल्या आहेत.

Related posts: