|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » काळबादेवी प्राथमिक शाळेत छताचा लाकडी बार कोसळलाकाळबादेवी प्राथमिक शाळेत छताचा लाकडी बार कोसळला 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी जिल्हा परिषद मराठी शाळेत मोठी दुर्घटना होण्यापूर्वी ती टळल्याची घटना रविवारी घडली. शाळेतील एका वर्गात छताचा 30 फुटी लाकडी बार कोसळल्याची धक्कादायक बाब सोमवारी समोर आली. रविवार असल्याने कासारवेली मराठी शाळेतील मोठी दुर्घटना टळल्याने साऱया ग्रामस्थ व शिक्षकांनीही सुटकेचा निश्वाःस टाकला.

कासारवेली जिल्हा परिषद मराठी शाळा सोमवारी सकाळी नित्याप्रमाणे उघडण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रेरणा जाधव यांनी शाळेतील इयत्ता 7 वी चा वर्ग उघडल्यावर समोरील भयावह प्रसंग पाहून चकीत झाल्या. वर्गातील छताखालील असलेला लांबलचक 30 फुटी लाकडी मोठा बार मोडून वर्गातील बाकडय़ांवर कोसळला. बाराला टांगलेले दोन पंखे आणि टय़ुब लाईटही लावण्यात आल्या होत्या. हा भीषण प्रकार पाहून शाळेतील शिक्षकांना मोठा धक्काच बसला.

रविवार सुट्टी असल्याने या दिवशीच ही घटना घडल्याने होणारा बाका प्रसंग टळला. जर शाळेच्या वेळेत वर्गात मुले असताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. शाळेतील शिक्षकांनी हा झालेला प्रकार शाळा कमिटीच्या कानावर घातला. हा प्रकार समजताच शाळा कमिटीचे विजय (बाबू) बोरकर, सुनील पोमेंडकर, बाबा दाते, मिलिंद साखरकर, नंदकुमार वायंगणकर, प्रभाकर गोळपकर, सुधाकर गोळपकर, मंगल शिंदे, तुकाराम मोडक, वसंत डोर्लेकर, समीर कोलगे, गुडय़ा बोरकर, उदय चव्हाण, सरपंच सौ.अनघा लाकडे, मंगल कटनाक, मयुरी जोशी, केंद्र प्रमुख, शिरगाव पंचायत समिती सदस्य राहेन इरफान साखरकर, पोलीस पाटील कृष्णकुमार केळकर, इरफान साखरकर, संतोष लाकडे मदतीसाठी धावले. ग्रामस्थांच्या मदतीने मोडून पडलेला लाकडी बार बाजूला करण्यात आला. ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या घडल्या प्रसंगाने प्राथमिक शाळांच्या बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!