|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज्य वृत्तपत्र विपेता संघटनेचे पालकमंत्री पाटील यांना निवेदन

राज्य वृत्तपत्र विपेता संघटनेचे पालकमंत्री पाटील यांना निवेदन 

कोल्हापूर

वृत्तपत्र विपेते, एजंट व व्यवसायातील इतर घटकांकरीता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, वृत्तपत्र विपेत्यांना संघटित करून त्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी काम करणारी राज्य वृत्तपत्र विपेता संघटना ही राज्यातील एकमेव संघटना आहे. राज्यातील किमान चार लाख लोकांचे साधन या व्यवसायावर आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता समाजापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विपेता करतात. वृत्तपत्राच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले आहेत. आगामी काही वर्षांत बदलाची संभावना नाही. या व्यवसायात अन्य घटकांपेक्षा वृत्तपत्र विपेता हा महत्त्वाचा घटक असूनही 25 पैसे इतक्मया तुटपुंज्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालतो. रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या व्यवसायात वृत्तपत्र विपेते अल्पशा मेहनतान्यावर राबत आहेत. आमची भावी पिढी शिक्षणापासून वंचित आहे. आरोग्याच्या सुविधांचा अभाव, औषधोपचार परवडत नसल्याने केवळ महाराष्ट्रातच अनेक विपेत्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. वृत्तपत्र व्यवसायातील विपेत्यांची शासन स्तरावर नोंद घ्यावी. अन्य घटकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी विपेत्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे केली. त्यांनी सकारत्मक प्रतिसाद देत 12 एप्रिलला तातडीने मुंबईत बैठकीचे आश्वासन दिले.

राज्य उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवगोंडा खोत, सदस्य किरण व्हनगुत्ते, परशराम सावंत, श्रीपती शियेकर, सुरेश ब्रह्मपुरे, राजाराम पाटील, सतिश दिवटे, रमेश जाधव, हिंदुराव कदम, अरविंद लंबे, अंकुश परब आदिंचा समावेश होता.

Related posts: