|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तवेरा-टेम्पोची समोरासमोर धडक

तवेरा-टेम्पोची समोरासमोर धडक 

वार्ताहर /उदगाव:

येथील जुन्या उदगाव टोल नाक्याजवळील उदगाव तमदलगे बायपास रस्त्यावर टेम्पो व तवेरा गाडीचा समोरासमोर झालेल्या अपघातात तवेरा गाडीचे मोठे नुकसान होऊन तवेरामधील तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी : सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने बायपासने टेम्पो जात होता तर कोल्हापूरहून तवेरा गाडी सांगलीकडे येत असताना येथील टोल नाक्याजवळील रेल्वे उड्डाण पुलानजीक बायपास रस्त्याजवळील वाहन वळणावर दोघांना वळणाचा अंदाज न आल्याने समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी मोठी होती की तवेरा गाडीचा दर्शनी भाग संपूर्ण चपटा झाला. या अपघातात तवेरा गाडीतील तीन व्यक्ती जखमी झाले. त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सुर्यवंशी यांनी तात्काळ धाव घेत वाहने बाजूला घेऊन वाहतूकीचा कोंडमारा टाळला.