|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दीड किलो गांजा जप्त, संशयितास अटक

दीड किलो गांजा जप्त, संशयितास अटक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अंबाई टँक परिसरातील मीनाक्षी अपार्टमेंटमध्ये गांजाचा साठा करून तो विकताना संशयित नितीन रघुनाथ भावे (वय 56) याला जुना राजवाडा पोलिसांनी गुरूवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून दीड किलो गांजा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.अंबाई टँक येथील मीनाक्षी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर प्लँट नं. 6 मध्ये संशयित नितीन भावे रहातो. शुक्रवारी त्याने विक्रीसाठी 1 किलो 580 ग्रॅम गांजा आणला होता. 10 ग्रॅम वजनाच्या 10 प्लॅस्टीकच्या बंद पुडय़ा सापडल्या. त्याच्या घरात काही गॅम गांजाही पिशवीत मिळून आला. शहर पोलीस उपाधिक्षक कार्यालयाच्या आरोपी शोध पथकाने भावे याच्या घरावर शुक्रवारी छापा टाकला. यावेळी संशयिताकडून मोबाईल आणि गांजा मिळून 17 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. संशयिताला अटक केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.