|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » जम्मू काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :

जम्मू – काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये भारतात घुसखोरीचा प्रयत्न सतर्क जवानांनी हाणून पाडला घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार दहशतवाद्यांना सैन्याच्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आले आहे. सैन्याच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून रविवारी रात्रीच्या अंधारात हा घुसखोरीचा प्रयत्न झाला होता.

कुपवाडामधील केरनमध्ये काही दहशतवादी भारतात घुसखोरी करत होती. या दरम्यान गस्तीवर असलेल्या सतर्क जवानांनी त्यांना बघितले.सुरक्षा दलाच्या जवानांनी या दहशतवाद्यांवर गोळीबार केला, या गोळीबाररत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने हे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते. या भागात अजूनही सैन्याची शोधमोहिम सुरू आहे. गेल्या आठवडय़ात पाकिस्तानकडून वारंवार घूसखोरीचा प्रयत्न झाला आहे.

Related posts: