|Thursday, March 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महिलांच्या नावावर व्हावी घरांची नोंदणी : पंतप्रधान

महिलांच्या नावावर व्हावी घरांची नोंदणी : पंतप्रधान 

नवी दिल्ली :

विकासात महिलाशक्तीचे मोठे योगदान असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराची नोंदणी महिलांच्या नावावर केली जावी असा सल्ला लोकांना दिला आहे. महिलांच्या स्थितीत सुधार आणण्यासाठी सातत्याने कायदे बदलले जात असून नवनवे कायदे आणण्यात आले आहेत. 26 आठवडय़ांची प्रसुती रजा देण्यात आल्याचे मोदींनी आयएमसीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

आपल्या सरकारने पॅनिक बटनद्वारे महिलांना सुरक्षा उपलब्ध केली असून याद्वारे योग्य वेळी महिलांना मदत मिळावी यासाठी पाऊल उचलल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.  पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले, यातील 70 टक्के कर्ज महिलांनी घेतले आहे. उज्ज्वला योजेनेंतर्गत 1 कोटी 20 लाख कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर जोडणी देण्यात आली. यामुळे कोटय़वधी कुटुंबांना धूरापासून मुक्ती मिळाल्याचा दावा मोदींनी केला.

 

Related posts: