|Saturday, October 20, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » आता आयफोनवर समजणार प्रदूषणाची लेव्हल

आता आयफोनवर समजणार प्रदूषणाची लेव्हल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगभरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोक आपले घर आणि ऑफिसमध्ये मोठय़ा एअर क्वालिटी मॉनिटरिंग डिवाइसच्या मदतीने प्रदूषणाची लेवल समजण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी आता आयफोनवर एअर क्लालिटी समजणार आहे.

प्रदूषणाची लेवल समजण्यासाठी आयफोनमध्ये सिलिकॉन व्हॅली बेस्ड स्प्रिमो लॅब्स्ने नव्या गॅजेटची निर्मिती केली आहे. या नव्या गॅजेटच्या माध्यमातून प्रदूषणाची लेवल चेक करण्यास मदत होणार आहे. स्प्रिमो कंपनी पर्सनल एअर मॉनिटरला आयफोनच्या लाइटनिंग पोर्टशी कनेक्ट करता येऊ शकते. हे गॅजेट बॅटरीविना ऑटोमॅटिकली आयफोनपासून पॉवर घेऊन काम करण्यास सुरुवात करणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तापमान आणि ह्युमॅडिटीला चेक करता येणार आहे.

Related posts: