|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » इंटरनेट वेगात ‘जिओ’ची भरारी

इंटरनेट वेगात ‘जिओ’ची भरारी 

नवी दिल्ली :

 दूरसंचार नियामक ट्रायने डाऊनलोड वेगाबाबत मार्च महिन्यात रिलायन्स जिओ सर्वोच्च स्थानी असल्याचे म्हटले. त्या महिन्यात जिओचा डाऊनलोड वेग 18.48 एमबीपीएस असून सर्वोत्तम कामगिरी असल्याचेही म्हटले. भारती एअरटेलचा वेग घटत 6.57 एमबीपीएसवर पोहोचला. व्होडाफोन तिसऱया स्थानी असून कंपनीचा डाऊनलोड वेग 6.14 एमबीपीएस, तर आयडिया 2.34 एमबीपीएस आहे. एअरसेलचा डाऊनलोड वेग 2.01 एमबीपीएसी आणि बीएसएनएल ही सरकारी कंपनी 1.99 एमबीपीएसने डाऊनलोड वेग देते असे ट्रायने म्हटले.