|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा

गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा 

उद्धव ठाकरे यांचा टोला

मध्यावधी निवडणुका आज झाल्या तरी सेनेची तयारी

एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान सुधारणार नाही

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मन की बात न करता गन की बात’ करा असा टोला लगावणाऱया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा भाजपवर हल्ला चढवताना भाजप सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असा सल्ला भाजपला दिला.

शिवसेनेचे नगरसेवक, आमदार, पदाधिकाऱयांच्या तीन दिवस मुंबईत रंगशारदा सभागफहात बैठका सुरू आहेत. यावेळी पदाधिकाऱयांना संबोधित करताना ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरू होती. मध्यावधी निवडणुकांना कोण घाबरतेय? मध्यावधी निवडणुका आज जरी घेतल्या तरी शिवसेनेची तयारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकार मात्र निरुपयोगी सरकार असल्याचे टीकास्त्रही त्यांनी फडणवीस सरकारवर सोडले. शेतकरी समस्या, गाय, पाकिस्तान आदी मुद्दय़ांवर त्यांनी राज्य तसेच पेंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

निवडणुकांआधी चाय पे चर्चा सुरू होती. आज गाय पे चर्चा सुरू आहे. गायीला आधारकार्ड, रुग्णवाहिका आदी देण्याचीही गोष्ट करण्यात येत आहे. गायीपेक्षा आज देशाला वाचविण्याची जास्त गरज आहे. देश वाचवायचा असेल तर आज सीमेवर जवानांचे जे दिवसाढवळय़ा मुडदे पडत आहेत ते थांबवणे गरजेचे आहे. पाकडय़ांची पन्नास मुंडकी आणा असे ते म्हणत आहेत. एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान सुधारणार नाही. पाकिस्तानमध्ये घुसा आणि तुकडे करा. शिवसेना तुमच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ईव्हीएम मशीनवर देखील उद्धव ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला. आधी शिक्का मारल्यावर मत कोणाला दिले हे कळायचे तरी पण आता बटन दाबल्यावर मत कोणाला दिले हे कळत देखील नाही. लोकशाहीचा अधिकारच या ईव्हीएममुळे गमावला आहे. दरम्यानच्या काळात मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतेची चर्चा सुरू होती. घ्या ना मध्यावधी निवडणुका, कोण घाबरतेय? मध्यावधी निवडणुका आज जरी घेतल्या तरी शिवसेनेची तयारी आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही. आणि सत्तेसाठी कधीच लाचार नव्हती. आम्हाला जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा एक क्षणही विचार करणार नाही. विरोधी पक्षाने आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या थांबवाव्या असा टोलाही त्यांनी लगावला.

उत्तरप्रदेशच्या यशाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले होते. मात्र, गोव्याच्या निकालांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गोव्यात काँग्रेसने कोणताही चेहरा दिला नव्हता तरी भाजपपेक्षा 4 जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. इथे देखील तुम्ही कोणी प्रचाराला आले नसतानाही चांगले यश मिळविलेत. समोर पैशांचा महापूर होता. तुमच्याकडे तर साधनसामग्रीची कमतरता होती. तरी देखील तुम्ही त्यावर मात केलीत असेही उद्धव ठाकरे पदाधिकाऱयांना म्हणाले. आपला एकच नेता शिवसेनाप्रमुख, एकच चिन्ह, एकच ध्येय आणि एकच भूमिका ती म्हणजे लोककल्याण. आपली जबाबदारी मोठी आहे. सत्ता असो किंवा नसो लोकांशी नम्रपणे वागा असे ठाकरे यांनी पदाधिकाऱयांना सांगितले.

Related posts: