|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोलिसांसाठी फिरते वस्तू भांडार

पोलिसांसाठी फिरते वस्तू भांडार 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी फिरते वस्तू भांडार सुरू केले आहे. जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यात व पोलीस वसाहतीमध्ये ठराविक दिवशी फिरते वस्तू भांडार जाणार आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस मुख्यालयामध्ये वस्तू भांडार सुरू करण्यात आले. परंतु दूरच्या पोलीस ठाण्यातील व वसाहतीमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना लाभ घेता येत नव्हता, हे लक्षात घेऊन नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी फिरते वस्तू भांडार सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील सर्व पोलीस ठाण्यातील व वसाहतीमधील पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. ठराविक दिवस त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला दिले जाणार आहेत. मंगळवारी वैभववाडी, विजयदुर्ग व देवगड या ठिकाणी फिरते वस्तू भांडार नेमण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांच्या या संकल्पनेबाबत पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related posts: