|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुसऱया मजल्यावरून पडून जखमी मुलीचा मृत्यू

दुसऱया मजल्यावरून पडून जखमी मुलीचा मृत्यू 

देवगड : पर्यटनानिमित्त देवगड शहरातील हॉटेलमध्ये राहण्यास गेलेल्या पुणे येथील एका पर्यटक कुटुंबातील पाच वर्षीय कु. सई हेमंत निकम ही दुसऱया मजल्यावरून पडल्याने गंभीररित्या जखमी झाली होती. तिच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. ही दुर्घटना 4 मे रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास घडली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथील हाँगकाँग बँकेत कामास असलेले हेमंत निकम हे कुटुंबियांसमवेत पर्यटनासाठी देवगडमध्ये आले होते. 4 मे रोजी ते देवगड शहरातील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले. हॉटेलच्या दुसऱया मजल्यावर निकम कुटुंबीय असताना त्यांची पाच वर्षीय मुलगी कु. सई ही खेळत-खेळत जिन्याकडे गेली व तेथे तिचा पाय घसरून ती सुमारे 20 फुटावरून जमिनीवर कोसळली. यात तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने जामसंडे येथील सरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने तिला प्राथमिक उपचारानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सई ही गेले पाच दिवस मृत्यूशी झुंज देत होती. मंगळवारी उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.

Related posts: