|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रजाहित दक्ष रयतेचा राजा शिवाजी महाराज

प्रजाहित दक्ष रयतेचा राजा शिवाजी महाराज 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

साडेतीनशे वर्षाच्या प्रदिर्घ अंधाऱया पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर युगपुरूष शिवबाच्या रूपाने महाराष्ट्राला खऱया अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनता जनार्दनाने आपला तारणहार छ. शिवरायांना ‘जाणता राजा’ हा किताब बहाल केला. शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. बादशहा सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले. राजमाता जिजाऊ व वडील शहाजी राजे यांनी त्यांना सुसंस्कारीत शिक्षण, युध्दशास्त्र राजकारण, न्यायशास्त्र, प्रजाहित दक्ष राजकारभाराचे धडे दिले. असे एकपात्री नाटय़प्रयोगातून नागपूरच्या सौ. कुंदा प्रधान यांच्या रसाळ वाणीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे आयोजीत करण्यात आलेल्या सतिश पाटील स्मृती प्रबोधन व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदयराव जोशी होते. यावेळी डॉ. सतिश घाळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. यावेळी सदगुरू फौंडेशनच्यावतीने जि. प. सदस्या प्रा. अनिता पाटील, श्रीमती रेखाताई हत्तरकी, पं. स. सदस्य विद्याधर गुरबे त्याचबरोबर डॉ. चंद्रशेखर देसाई, किशोर हंजी, भरत पाटील, सरपंच वैशाली पोवार, मेहबूब मेस्त्राr यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. प्रधान यांनी एकपात्री नाटय़प्रयोगातून महाराजांचा इतिहास उलघडला. आपल्या मावळय़ांच्या मदतीने राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून प्रजेला भयमुक्त केले. राज्य कारभार शिस्तीने चालावा यासाठी अष्टप्रधान नेमले. आयुष्यभर प्रजेच्या कल्याणासाठी झटणारे शिवराय अधुनिक लोकशाही, राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ पुर्ण केले. हे एकपात्री नाटय़प्रयोगातून सादर केलेल्या, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांचा विलक्षण नाटय़मय जिवन संघर्षाचा पाढा उलघडून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्या. यावेळी डॉ. सतिश घाळी व उदयराव जोशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सौ. तेजस्विनी पाटील यांनी आभार मानले. महाबळेश्वर चौगुले, राजेश पाटील, डॉ. रमेश पाटील, संजय अजगर, आण्णासो भोसले, डॉ. राजू चौगुले यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related posts: