|Monday, May 27, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधानांच्या भेटीनंतर रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ?

पंतप्रधानांच्या भेटीनंतर रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजकारणातील प्रवेशाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

पंतप्रधान आणि रजनीकांत यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे रजनीकांत हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. पुढील आठवडय़ात रजनीकांत पंतप्रधानांची भेट घेणार असून, या भेटीनंतर राजकारणात प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, तामिळनाडूमधील भाजपच्या नेत्यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच आम्हाला या घडामोडींबाबत कोणतीही कल्पना नाही, असे भाजपच्या एका स्थानिक नेत्यानी सांगितले.

Related posts: