|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » यूपीए सरकारपेक्षा दुप्पट कर्जमाफ करणार : मुख्यमंत्री

यूपीए सरकारपेक्षा दुप्पट कर्जमाफ करणार : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम/ मुंबई:

यूपीए सरकारपेक्षा शेतकऱयांचे दुप्पट कर्जमाफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शुक्रवारी झालेल्या शेतकऱयांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱयांना कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी शेतकऱयांनी संप पुकारला होता. यामुळे राज्यात भाजीपाला आणि दुधाचा तुटवडा जाणवू लागला होता. शुक्रवारी शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकऱयांचे 70 टक्के मागण्या मान्य असल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर शेतकऱयांनी संप मागे घेतला. यूपीए सरकारपेक्षा दुप्पट कर्जमाफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचबरोबर काही राजकीय पक्षांकडून संपाला गालबोट लावायचा प्रयत्न केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

Related posts: