|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » Top News » ‘गणित’ ऐच्छिक होऊ शकतो का ? उच्च न्यायालयाचा शिक्षण मंडळाला सवाल

‘गणित’ ऐच्छिक होऊ शकतो का ? उच्च न्यायालयाचा शिक्षण मंडळाला सवाल 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

गणित हा विषय ऐच्छिक विषय होऊ शकतो का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला केला. असे केल्यास राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास मदतच होईल, असेही न्यायालयाचे मत आहे.

1975 पर्यंत दहावीला 8 विषयांपैकी एका विषयात नापास होणाऱयांनाही पास केले जात असे. यामध्ये गणिताचाही समावेश होता. त्यामुळे आता असे का नाही. याशिवाय कला शाखेत जाऊन पदवीचे शिक्षण घेणाऱया गणिताचा फायदा काय ? शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी याचा गांर्भीयाने विचार करायला हवा, असे केल्यास गणिताच्या भीतीने शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱयांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल, असे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी व्यक्त केले आहे.

Related posts: