|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डॉ. मृत्युंजय कवटगीमठ यांचे निधन

डॉ. मृत्युंजय कवटगीमठ यांचे निधन 

प्रतिनिधी /चिकोडी :

चिकोडी येथील कवटगीमठ घराण्यातील सुप्रसिद्ध वैद्य तसेच संकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्याधिकारी डॉ. मृत्युंजय सूर्यकांत कवटगीमठ (वय 53) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्मयाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांचे ते चुलत बंधू होत.

  डॉ. मृत्युंजय कवटगीमठ हे एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते. आरोग्यविषयक सेवा बजावण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे. आपल्याकडे येणाऱया ऋग्णांना योग्य सल्ला देत असल्याने ते सर्वांना आपलेसे वाटायचे. त्यांच्या अचानक निधनाने कवटगीमठ घराण्यात न भरता येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता हालट्टी येथील कवटगीमठ घराण्याच्या स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यक्रिया करण्यात येणार आहेत.

Related posts: