|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार

सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार 

नवी दिल्ली

: जम्मू-काश्मीरमधील 498 किमी अंतराच्या बिलासपूर-मनाली-लेह रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्वेक्षण मोहीम या आठवडय़ात सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते जून 27 रोजी अंतिम स्थळ सर्वेक्षणाला प्रारंभ होणार असल्याची अधिकृत माहिती रविवारी देण्यात आली. समुद्रसपाटीपासून 33,000 मीटर उंचीवरील हा जागतिकदृष्टय़ा सर्वाधिक ऊंचीवरील रेल्वेमार्ग असणार आहे. याबाबत सध्या चीनच्या किगहाई-तिबेट लोहमार्गाचा पहिला क्रंमाक आहे. भारत-चीन सीमेरेषेनजीक अस्तित्वात येत असलेले हा प्रकल्प देशासाठी सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्वेक्षणकार्यासाठी 157.77 कोटी रुपयांचा अनुमानित खर्चाचा भार संरक्षण मंत्रालयकडून उचलला जाणार आहे. सुंदर नगर मंडी, मनाली, तांडी, केलाँग, कोकसर, दर्चा, उपशी आणि कारू ही महत्त्वाची ठिकाणे यामुळे जोडली जाणार आहेत.

 सामरिक महत्वाव्यतिरीक्त जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या पहाडी राज्याकरीता हे प्रकल्प सामाजिक आणि आर्थिक महत्वसुद्धा बाळगून आहे. चीन, नेपाळ आणि पाकिस्तानलगतच्या सीमाभागात संरक्षण मंत्रालयाकडून लोहमार्गाचा विकास करण्यात येत आहे. बिलासपूर-लेह लोहमार्ग अस्तित्वात आल्यानंतर सर्वाधिक उंचीवरील लेह लष्करी तळावर लष्करी कुमक, युद्धसामग्री इत्यादींची अधिक सुलभतेने आणि वेगाने पुरवठा करता येण शक्य होणार आहे.