|Monday, October 15, 2018
You are here: Home » क्रिडा » सुंदर सिंग गुर्जरला सुवर्ण

सुंदर सिंग गुर्जरला सुवर्ण 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी सुंदर सिंग गुर्जरने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. एफ-46 कॅटेगिरीमध्ये पुरूषांच्या भालाफेकीत सुंदर सिंगने 60.36 मी.चा भालाफेक करत आपल्या देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या क्रीडाप्रकारातील गुर्जरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. लंकेच्या दिनेश हेराथने या क्रीडाप्रकारात 57.93 मी.चा भालाफेक करत रौप्यपदक तर चीनच्या चुनलियाँगने 56.14 मी.चा भालाफेक करत कास्यपदक मिळविले.

राजस्थानच्या 21 वर्षीय सुंदर सिंगला गेल्यावर्षी रिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत पात्र ठरविण्यात आले होते. सुंदर सिंगने फेझा आयपीसी ऍथलेटिक्स ग्रा प्रि स्पर्धेत यापूर्वी दमदार कामगिरी करताना भालाफेक, गोळाफेक आणि थाळीफेक या प्रकारात तीन सुवर्णपदके मिळविली होती.

Related posts: