|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीमेनजीक चीनचा शस्त्रास्त्रांचा साठा

सीमेनजीक चीनचा शस्त्रास्त्रांचा साठा 

तिबेटमध्ये चीनचे सैन्य तैनात : कित्येक टन सैन्यसामग्री रवाना, दीर्घ

वृत्तसंस्था/ बीजिंग

डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर ठाकण्याच्या घटनेला एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. एवढय़ा वेळेत कूटनीतिक स्तरावरच नव्हे तर सामरिक तयारींच्या दृष्टीकोनातून देखील चीन या क्षेत्रात स्वतःला बळकट करण्याच्या हालचाली करतोय. चीन मागील एक महिन्यापासून सिक्किम सीमेनजीक तिबेटमध्ये शस्त्रास्त्रs अणि सैन्यसामग्री जमा करत असल्याचे वृत्त आहे.

भारताला लागून असलेल्या तिबेटमध्ये ‘हजारो टन’ सैन्यसामग्री जमा करण्यात आली. भारतासोबतचा सीमा वाद हाताळणाऱया वेस्टर्न थिएटर कमांडने रेल्वे आणि रस्तेमार्गाचा वापर करत ही सामग्री तिबेटमध्ये पोचविल्याचे चीनच्या प्रसारमाध्यमाने म्हटले. सीमावाद दीर्घकाळ ताणला जाईल या आशंकेपोटी भारताला चोहोबाजूंनी घेरण्याचा आणि दबाव आणण्याचा जोरदार प्रयत्न चीन करत असल्याचे पीएलए डेलीने म्हटले.

पीएलए डेली हे चीनच्या सैन्याचे मुखपत्र आहे. चीन डोकलाममध्ये सुरू असलेला वाद समाप्त करण्यासाठी प्रतिदिन नवनवे मार्ग अवलंबित असून एकीकडे चीनची सरकारी माध्यमे याप्रकरणी उघडपणे भारताला धमकावित आहेत, तर चीन कूटनीतिक आणि सैन्यस्तरावर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय.

दबावाचे धोरण

शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि त्यांना भारतीय सीमेनजीक पोचविणे भारतावर दबाव निर्माण करण्याच्या रणनीतिचा भाग आहे. याचा उद्देश भारताला चर्चेसाठी भाग पाडणे असू शकतो. चिनी प्रसारमाध्यमांनी शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीचा उल्लेख केला असला तरी यामागचा उद्देश नमूद करणे मात्र टाळले. चीन अरुणाचलनजीक तिबेटमध्ये सैन्य अभ्यास करणार असून बौद्ध धर्मगुरु दलाई लामांच्या अरुणाचल दौऱयानंतर अत्याधिक आक्रमकता दाखवत आहे. अरुणाचल दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन नेहमीच करत आला आहे.

डोकलाम वाद

तिबेटच्या चुंबी खोऱयात स्थित डोकलाम येथे रस्त्याच्या निर्मितीचा प्रयत्न चीनने केला होता. डोकलाम हा भूतानचा भूभाग असून चीनच्या या प्रयत्नाला भारत आणि भूतान दोन्ही देशांनी विरोध केला. डोकलाम भाग त्रिसंगम क्षेत्राजवळ असून सामरिकदृष्टय़ा तो अत्यंत संवेदनशील आहे. ईशान्येकडील राज्यांना जोडणारा सिलिगुडी पट्टा डोकलामपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. भूतानच्या हद्दीत येणाऱया डोकलाममध्ये रस्त्याची निर्मिती केल्यास अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत घातक ठरेल अशी भूमिका भारताने घेतली आहे. जोपर्यत चीन डोकलाममधून बाहेर पडत नाही, तोपर्यंत भारत आपले पाऊल मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मोदी सरकारने घेतली आहे.

काळासाठी तयारी

Related posts: